आजचे दिनविशेष


१५ मे महत्वाच्या घटना
१७१८ : जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.
१७३० : रॉबर्ट वॉल्पोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.
१८११ : पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.
१८३६ : सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्या बेलीज बीड्सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.
१९२८ : मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी या शो मधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले.
१९३५ : मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
१९४० : दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९४० : सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे मॅक्डोनाल्डस (McDonalds) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.
१९५८ : सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ३ चे प्रक्षेपण केले.
१९६० : सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४ चे प्रक्षेपण केले.
१९६१ : पुण्याच्या चतु:शृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू.
२००० : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू – काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ जण ठार.
२०२२ : थॉमस कप - भारत पहिल्यांदा थॉमस कप बँडमिन स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला.
२०२२ : राजीव कुमार - भारताचे २५वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
१५ मे जन्म
१८१७ : भारतीय तत्त्ववेत्ते आणि लेखक देवेन्द्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९०५)
१८५९ : नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्युरी यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९०६)
१९०३ : साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७७)
१९०७ : क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)
१९६७ : अभिनेत्री माधुरी दिक्षीत-नेने यांचा जन्म.
१९८५ : भारतीय अभिनेते तथागत मुखर्जी यांचा जन्म
१९५१: अमेरिकन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक विजेते फ्रँक विल्झेक यांचा जन्म
१९३५ : भारतीय राजकारणी, केरळचे आमदार आर्यदान मुहम्मद यांचा जन्म (मृत्यू : २५ सप्टेंबर २०२२)
१९३१ : भारतीय न्यायाधीश व राजकारणी सुखदेव सिंग कांग यांचा जन्म (मृत्यु : १२ ऑक्टोबर २०१२)
१९१५ : अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक विजेते पॉल सॅम्युएलसन यांचा जन्म (मृत्यू : १३ डिसेंबर २००९)
१९०७ : भारतीय क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म (मृत्यू : २३ मार्च १९३१)
१५ मे मृत्यू
१३५० : संत जनाबाई यांचे निधन.
१७२९ : वैशाख व. १४, शके १६५१ मराठेशाहीच्या आपत्प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन.
१९९३ : स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८९९)
१९९४ : जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचे निधन.
१९९४ : चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू पी. सरदार यांचे निधन.
२००० : जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते सज्जन यांचे निधन.
२००७ : लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक जेरी फेलवेल यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९३३)
२०२२ : भारतीय अभिनेत्री पल्लवी डे यांचे निधन
News - todayspecialdays




Petrol Price




