भंडारा-मोहाडी पोलिस हद्दीत धाडसी चोरी : पीयूष फर्निचर मार्टमधून ७५ हजारांची रोकड लंपास

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा-तुमसर मार्गावरील दहेगाव ते मोहाडी दरम्यान असलेल्या पीयूष फर्निचर मार्टमध्ये पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. मोहाडी पोलिस हद्दीत घडलेल्या या घटनेत तिघा अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील अंदाजे ७५ हजार रुपयांची रोकड लंपास केली.
२७ एप्रिल रोजी सकाळी अंदाजे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी घडली. दुकान मालक भगवान पुडके यांना सकाळी शटर तुटल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पाहणी केली असता दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आणि गल्ल्यातील रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
मोहाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असून, पोलीस तपासात गुन्ह्याशी संबंधित कोणत्याही साक्षीदारांची माहिती गोळा केली जात आहे.
विशेष म्हणजे, ही चोरी पोलिस ठाण्यापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर घडल्याने परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलीस संपर्क करण्याचे सुचवले आहे.
News - Bhandara




Petrol Price




