महत्वाच्या बातम्या

 ९ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई याच्या निर्देशान्वे जिल्हा वः सत्र न्यायालय, भंडारा तसेच  साकोली, लाखनी, तुमसर, माहोडी, पवनी लाखांदूर येथील तालु‌का न्यायालयात शनिवार, ९ मे.२०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबीत तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, १३८ परिक्रम्य लेख अधिनियमाची प्रकरणी भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, एम. एस. ई. बी. प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, ग्राहक तक्रार न्याय निवारण प्रकरणे, न्यायालयातील प्रकरणे, न्यायालयातील बँकेशी संबधित प्रलंबित प्रकरणे तसेच वाद दाखल पूर्व प्रकरणांमध्ये टेलिफोन/मोबाईल कपनी संबंधित राष्ट्रीयकृत बँक, पतसंस्था, ग्रामपंचायत प्रकरणे दाखलपूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालत मध्ये ठेवण्यात आली आहे. 

राष्ट्रीय लोक आदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित प्रकरणे तसेच वाद दाखल पूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकाराच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यास येणार आहे, पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी शनिवार ९ मे रोजी आयोजीत राष्ट्रीय लोक अदालत समोर मोठ्या प्रमाणात प्रकरण ठेवून आपसी तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन राजेश गोविंद अस्मर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांनी केले आहे.

न्यायालयाबाहेर सामजस्याने, जडजोडीन, आणि जलदगतीने कायदेशीर विवाद मिटविणारी एक पर्यायी यंत्रणा आहे या माध्यमातून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्फत राष्ट्रीय लोक अदालत मध्ये पक्षकाराना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते. तसेच दोन्ही पक्षकाराना मान्य असलेली तडजोड पक्षकरांच्या आपसी सहमतीने होते त्यामुळे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये झालेला न्याय निवाडा तडजोडीचे समाधान दोन्ही पक्षकराना असते. 

पक्षकारांना न्यायासाठी लागणारा वेळ व पैसा दोन्ही ची बचत होते त्यामुळे पक्षकारांनी शनिवार ९ मे रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदातीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे तडजोडीसाठी ठेवावीत असे आवाहन मिलींदकुमार विनायक बुराडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos