गडचिरोली शहर नालीसफाई विशेष मोहीम


- दिवस पहिला : प्रभाग क्रमांक ५, विवेकानंद नगर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरात स्वच्छता राखण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या नालीसफाई विशेष मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या मोहिमेच्या पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक ५, विवेकानंद नगर येथे व्यापक स्वरूपात नालीसफाई करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक प्रशासनासोबत लोकप्रतिनिधीही सक्रिय सहभाग घेताना दिसले.
नगराध्यक्ष प्रणोती ताई निंबोरकर, नगरसेवक सागर भाऊ निंबोरकर तसेच नगरसेविका सीमाताई कन्नमवार यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
नालीसफाई मोहिमेमुळे शहरातील साचलेले पाणी, कचरा व अस्वच्छता कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




