तुमसर : पाण्याच्या डबक्यात बुडून दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : तालुक्यातील रोघा गावात ३१ मार्चपासून बेपत्ता असलेल्या दोन लहान मुलांचा १ एप्रिल रोजी पाण्याच्या डबक्यात मृतदेह आढळून आला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ पसरली आहे.मृत मुलांची नावे चंद्रकांत रूपचंद कुंभरे (७) आणि समर्थ संजय उईके (६) अशी आहेत. दोघेही ३१ मार्च रोजी सायंकाळपासून बेपत्ता होते. गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी रात्रभर शोधमोहीम राबवली, परंतु त्यांचा काही ठावठिकाणा मिळाला नाही.
दरम्यान, १ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास गावाजवळील पाण्याच्या डबक्यात दोन्ही मुलांचे मृतदेह तरंगताना आढळले. ही माहिती समोर येताच गावात शोककळा पसरली. या घटनेमुळे गावकऱ्यांनी लहान मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज अधोरेखित केली आहे.
News - Bhandara




Petrol Price




