महत्वाच्या बातम्या

 हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील कुपोषणाच्या समस्येत वाढ : मातेच्या पोषणाला प्राधान्य देण्याचे युनिसेफ चे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्यात वाढते तापमान, दुष्काळ आणि कृषी क्षेत्रावर वारंवार येणारी संकटे यामुळे कुपोषणाची समस्या अधिकच गंभीर होत चालली आहे.


राज्यात वाढते तापमान, दुष्काळ आणि कृषी क्षेत्रावर वारंवार येणारी संकटे यामुळे कुपोषणाची समस्या अधिकच गंभीर होत चालली आहे.  सर्वाधिक चिंता गर्भावस्थेतील त्या निर्णायक काळाची आहे, जेव्हा बाळाच्या मेंदूचा पाया घातला जातो. हवामान बदल आणि अपुरा आहार यांचा थेट फटका गर्भवती महिलांना बसत असून त्याचे दीर्घकालीन परिणाम पुढील पिढीवर उमटण्याचा धोका वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर मातेच्या पोषणाला सर्वोच्च प्राधान्य देणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन युनिसेफने केले आहे.

युनिसेफ-इंडिया आणि केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार २५ मार्च रोजी आयोजित एका विशेष क्षमता निर्मिती कार्यशाळेत या प्रश्नावर चर्चा करण्यात आली.

हवामान बदलामुळे अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत, ज्यामुळे आहारातील वैविध्य कमी होत आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील आदिवासी भाग, शहरी झोपडपट्ट्या आणि कृषीप्रधान जिल्ह्यांतील गर्भवती महिलांना बसत असल्याचे निरीक्षण या कार्यशाळेत नोंदवण्यात आले. 





  Print






News - Nagpur




Related Photos