पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळावा आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयातील नोकरीइच्छुक युवक व युवतींकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करून त्यांना खाजगी क्षेत्रातील नामांकित कंपन्याच्या माध्यमातून अधिक मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उददेशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा व व स्टारवॉर्ट पीपल सर्विस इंडिया लिमिटेड तर्फे सनफ्लॅग आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड भंडारा रोड वरठी यांच्या संयुक्त विद्यामाने यांच्या संयुक्त विद्यामाने २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ०९.०० ते दुपारी. १२.०० व दुपारी. ०२.०० ते ५:०० या वेळेत सनफ्लॅग आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड भंडारा रोड वरठी या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर रोजगार मेळावाची या कार्यालयाकडून व्यापक प्रमाणात प्रसिध्दी करण्यात येत आहे. सदर रोजगार मेळावामध्ये विविध कंपनी / इंडस्ट्रीज / प्लेसमेंट एजन्सीज / औद्योगिक आस्थापना सहभागी होणार असून त्यांचेद्वारा जिल्हयातील नोकरीइच्छुक युवक व युवतींना मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सदर रोजगार मेळाव्यात स्टारवॉर्ट पीपल सर्विस इंडिया लिमिटेड तर्फे सनफ्लॅग आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड भंडारा रोड वरठी इ. कंपनी / आस्थापना सहभागी होणार आहेत.
सदर आस्थापनांमध्ये एकूण १०० सुरक्षा गार्ड रिक्त पदांकरिता भरती होणार आहे व जागेवरच निवड होण्याची संधी उपलब्द होणार आहे.
सदर मेळाव्यामध्ये मुलाखत व तत्सम प्रक्रीयेद्वारा उमेदवारांची निवड होणार असल्याने उमेदवारांनी बायोडेटा, शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती व पासपोर्ट फोटोसह मेळाव्याच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे. नोकरीइच्छुक युवक व युवतींनी सदर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मेळाव्याच्या दिवशी ऑफलाईन नोंदणी करता येईल.
सदर रोजगार मेळावामधील रोजगाराच्या सुवर्णसंधीचा जिल्हयातील अधिकाधीक नोकरीइच्छुक व गरजू युवक व युवतींनी तसेच, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त गावातील नोकरीईच्छुक उमेदवारांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवुन रोजगाराच्या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.सुधाकर झळके, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांनी केले आहे.
याबाबत काही अडचण / शंका असल्यास कार्यालयाच्या ०७१८४-२५२२५० या दुरध्वनी क्रमांकावर किंवा चेतन बागडे - ८९९९०७०३२८, अतुल पडोळे -९३२२१५१७८० या भ्रमणध्वनी क्रंमाकावर संपर्क साधावा.
News - Bhandara




Petrol Price




