महत्वाच्या बातम्या

 रामायण कथा ऐकण्यास गेलेल्या कुटुंबाच्या घरात घरफोडी : ६८ हजारांचा ऐवज लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : तुमसर तालुक्यातील खंदाड येथे घरफोडीची घटना घडून सुमारे ६८ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गोबरवाही पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजयमाला सुरेश भोरगडे (वय ५१, रा. खंदाड) या १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आपल्या सासूसोबत गावातील शिवमंदिरात रामायण कथा ऐकण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी घर कुलूपबंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेण्यात आली.

चोरी झालेल्या साहित्यामध्ये अंदाजे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, सुमारे १०० ग्रॅम चांदीच्या तोरड्या तसेच १० हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे. एकूण चोरीचा ऐवज सुमारे ६८ हजार रुपये किमतीचा असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos