सावरी येथे ४० वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : सावरी (ता. जि. गोंदिया) येथे शुक्रवारी सायंकाळी एका ४० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी रावणवाडी पोलिस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृताचे नाव भुमेश नीलकंठ बघेल (वय ४०, रा. सावरी) असे असून, २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास त्यांनी राहत्या घरासमोरील खोलीतील पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मृतदेह पाठविण्यात आला असून घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून रावणवाडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
News - Gondia




Petrol Price




