२३ फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयातील नोकरीइच्छुक युवक व युवतींकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करून त्यांना खाजगी क्षेत्रातील नामांकित कंपन्याच्या माध्यमातून अधिक मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उददेशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा यांचे द्वारा २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत परमवीर चक्र विजेता मेजर ध्यानसिंग थापा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहाडी या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळावा ( प्लेसमेंट ड्राईव्ह ) आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्याची या कार्यालयाकडून व्यापक प्रमाणात प्रसिध्दी करण्यात येत आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपनी / इंडस्ट्रीज / प्लेसमेंट एजन्सीज / औद्योगिक आस्थापना सहभागी होणार असून त्यांचेद्वारा जिल्हयातील नोकरीइच्छुक युवक व युवतींना मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सदर रोजगार मेळाव्यात Kairos Health And Composite Services PVT. LTD. Hyderabad, LIC Bhandara, Sun-Flag Bhandara इ. कंपनी / आस्थापना सहभागी होणार आहेत. सदर आस्थापनांमध्ये एकूण १४७ रिक्त पदांकरिता भरती होणार आहे.
सदर मेळाव्यामध्ये मुलाखत व तत्सम प्रक्रीयेद्वारा उमेदवारांची निवड होणार असल्याने उमेदवारांनी बायोडेटा, शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती व पासपोर्ट फोटोसह मेळाव्याच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे. नोकरीइच्छुक युवक व युवतींनी सदर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मेळाव्याच्या दिवशी ऑफलाईन नोंदणी करता येईल.
सदर रोजगार मेळावामधील रोजगाराच्या सुवर्णसंधीचा जिल्हयातील अधिकाधीक नोकरीइच्छुक व गरजू युवक व युवतींनी तसेच, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त गावातील नोकरीईच्छुक उमेदवारांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवुन रोजगाराच्या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.सुधाकर झळके, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांनी केले आहे. याबाबत काही अडचण / शंका असल्यास कार्यालयाच्या ०७१८४-२५२२५० या दुरध्वनी क्रमांकावर किंवा अविनाश खेडीकर -८३२९४७२९१५ अतुल पडोळे -९३२२१५१७८० या भ्रमणध्वनी क्रंमाकावर संपर्क साधावा.
News - Bhandara




Petrol Price




