महत्वाच्या बातम्या

 होळी व सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गांवर विशेष रेल्वेगाड्या धावणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : होळी आणि सलग सुट्ट्यांच्या काळात प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने विविध मार्गांवर विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई–नागपूर, पुणे–नागपूर तसेच सावंतवाडी रोड, बनारस, गोरखपूर, समस्तीपूर, दानापूर आणि हजरत निजामुद्दीन मार्गावर या गाड्या धावणार आहेत.

मुंबई–नागपूर द्वैसाप्ताहिक विशेष गाडी -
मुंबई–नागपूर द्वैसाप्ताहिक विशेष गाडी २२ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत दर रविवारी आणि मंगळवारी चालविली जाईल. गाडी मुंबईहून पहाटे ००:२० वाजता सुटेल आणि दुपारी १५:१० वाजता नागपूरला पोहोचेल.

परतीची गाडी नागपूरहून दर रविवारी आणि मंगळवारी रात्री २०:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १३:३० वाजता मुंबईत पोहोचेल. या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील.

पुणे–नागपूर साप्ताहिक एसी विशेष गाडी -
पुणे–नागपूर साप्ताहिक एसी विशेष गाडी २४ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी मंगळवारी पुण्याहून सुटून दुसऱ्या दिवशी नागपूरला पोहोचेल. परतीची गाडी नागपूरहून २५ फेब्रुवारी आणि ४ मार्च रोजी सकाळी ०८:०० वाजता सुटेल. तसेच, पुणे–नागपूर साप्ताहिक विशेष गाडी २५ फेब्रुवारी आणि ४ मार्च तसेच २६ फेब्रुवारी आणि ५ मार्च रोजी धावेल. गाड्यांचे थांबे उरळी, दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे असतील.

सर्व विशेष गाड्यांच्या संरचनेत एसी-दोन टियर, एसी-तीन टियर, शयनयान, सामान्य द्वितीय श्रेणी आणि गार्ड ब्रेकव्हॅनचा समावेश आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos