महत्वाच्या बातम्या

 आमगावात शिवमंदिर परिसरात युवकाचा संशयास्पद मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : आमगाव शहरातील देवरी रोडवरील शिवमंदिर परिसरात एक युवक बेशुद्धावस्थेत आढळून आल्यानंतर उपचारासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२९) सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृत युवकाचे नाव धनिराम काशीराम भांडारकर (४५, रा. बनगाव) असे असून, गुरुवारी सकाळी तो शिवमंदिर परिसरात बेशुद्धावस्थेत पडून असल्याचे सफाई कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. त्याने तत्काळ याबाबत आमगाव पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन धनिराम यांना उपचारासाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या प्रकरणी मृताचे नातेवाईक रतिराम सुखराम भांडारकर (वय ३६, रा. बनगाव) यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.





  Print






News - Gondia




Related Photos