महत्वाच्या बातम्या

 राजस्थानी सेन समाज भवनाचे भूमिपूजन उत्साहात


- हनुमानजींची प्राणप्रतिष्ठा व दीपावली मिलन समारोहाचेही आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : अमरावती रोडवरील चौदा मील परिसरात राजस्थानी सेन समाज भवनाच्या बांधकामासाठी भूमिपूजन सोहळा हर्षोल्हासपूर्ण व धार्मिक वातावरणात पार पडला. यासोबतच हनुमानजींची प्राणप्रतिष्ठा, दीपावली मिलन समारोह तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाज भवनाचे भूमिपूजन  चिराग निर्बाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.  हनुमानजींच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त विधिवत पूजन व यज्ञाचे आयोजन करण्यात आले. या यज्ञामध्ये  रामाकिसनजी मारोठी,  घनश्यामजी बणभेरू,  दुलीचंदजी धावरिया,  रविंद्र गेहलोत आणि  शिवकुमारजी झाकड़ा यांनी यजमान म्हणून सहभाग घेतला.

यावेळी मंदिरातील ध्वजारोहण व कलश स्थापना मूलचंदजी निर्बाण यांच्या शुभहस्ते करण्यात आली. धार्मिक विधी व पूजाअर्चेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाला  ओमजी मावतवाल, गोपालजी भाटी,  सुभाषजी निर्बाण (वरोरा),  जसईवाल मीराबाई गेहलोत (आर्वी),  सुभाषजी (अहिल्यानगर), आशा धावरिया, नीलिमा खिंची यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. भूमिपूजन, प्राणप्रतिष्ठा आणि दीपावली मिलन सोहळा उत्साहात पार पडला.





  Print






Related Photos