महत्वाच्या बातम्या

 १ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली १ ऑगस्ट रोजी विकास भवन येथे वर्धा विधानसभा क्षेत्र अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिरात नागरिकांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या समाधान शिबिरात नागरीकांना महसूल विभागाच्या सेवा, सुविधा व इतर विभागाच्या सेवा एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देण्याबाबत प्रमाणपत्र वाटप. गावठाणातील नागरीकांना स्वामित्व सनद, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमीनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत स्थानिक क्षेत्र घोषित करणे, जिवंत सातबारा मोहिमेची अंमलबजावणी करणे, सिंधी विस्थापितांच्या निवासी व व्यावसायिक जमीनी फ्रि-होल्ड करण्यासाठी विशेष अभय योजना-२०२५ ला एक वर्ष मुदतवाढ देणे, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना लाभ, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यासाठी विशेष तरतुद, कुंभार समाजाला पारंपारीक व्यवसायासाठी सवलती, शेत जमीनीच्या कौटुंबिक वाटणी पत्रावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करणे या सेवा/सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसेच या योजनेव्यतीरिक्त शिबीरामध्ये महसूल विभागाबरोबरच केंद्र व राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेला योजनेचा लाभ जास्तीत जास्त कसा करुन देता येईल याबाबत महसूल विभाग व इतर सर्व विभागाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे, असे उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे यांनी कळविले आहे.

 





  Print






News - Wardha




Related Photos