आजचे दिनविशेष


२४ जून महत्वाच्या घटना
१४४१ : इटन कॉलेजची स्थापना.
१७९३ : फ्रान्समधील पहिल्या प्रजासत्ताक घटनेचा अवलंब केला गेला.
१८८० : ओ कॅनडाचे हे गाणे कॅनडाचे राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले गेले.
१९३९ : सयामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले.
१९४० : दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.
१९८२ : कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड शिकविण्याची सक्ती.
१९९६ : मायकेल जॉन्सनचा १९.६६ सेकंदांत २०० मीटर धावून विश्वविक्रम.
१९९८ : अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर.
२००१ : आय. एन. एस. विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकी करणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.
२०१० : जुलिया गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
२०२२ : गर्भपात करण्याच्या अधिकारावर अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लावले.
२०२२ : गौतम अदानी यांनी ६० हजार रुपये अनेक सामाजिक कारणांसाठी दान करण्याची घोषणा केली
२०१० : सर्वात जास्त वेळ चालणारी टेनिस मॅच, विम्बल्डन - अमेरिकेच्या जॉन इस्नर आणि फ्रान्सच्या निकोलस माहुत यांच्यातील मॅच ८ तास ११ मिनिट चालली. ही इतिहासातील सर्वात जास्त वेळ चालणारी टेनिस मॅच आहे.
२००४ : अमेरिका - न्यूयॉर्कमध्ये फाशीची शिक्षा असंवैधानिक घोषित करण्यात आली.
१९८१ : हंबर ब्रिज, इंग्लंड - देशातील यॉर्कशायर आणि लिंकनशायर शहरांना जोडणारा २.२ किमी लांबीचा पूल वाहतुकीसाठी खुला झाला. हा त्याकाळातील सर्वात लांब पूल होता.
१९१८ : कॅनडा - मॉन्ट्रियल ते टोरोंटो अशी पहिली एअरमेल सेवा सुरु.
१९१६ : मेरी पिकफोर्ड ह्या १० लाख (१ मिलिअन) डॉलर्स मानधन मिळवणाऱ्या पहिल्या महिला चित्रपट अभिनेत्री बनल्या.
२४ जून जन्म
१८६२ : रविकिरण मंडळाचे संस्थापक श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९७४)
१८७० : चार्ल्स रँड याची हत्या करणारे दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १८९८)
१८९३ : द वॉल्ट डिस्नी कंपनी चे सह-संस्थापक रॉय ओ. डिस्नी यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९७१)
१८९७ : ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडीत औंकारनाथ ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २९ डिसेंबर १९६७)
१८९९ : मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा कोल्हापुर येथे जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७४)
१९०८ : कथकली नर्तक गुरूगोपीनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९८७)
१९२७ : तामिळ लेखक कवि यरासू कन्नडासन यांचा जन्म.
१९२८ : महाराष्ट्रातील लोकनेत्या मृणाल केशव गोरे यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै २०१२)
१९३७ : ज्येष्ठ लेखिका अनिता मुजूमदार देसाई यांचा मसुरी येथे जन्म.
१९७९ : अमेरिकन ऍक्रोबॅट, एरिअलिस्ट, डेअरडेव्हिल, हाय वायर आर्टिस्ट निक वॉलेंडा यांचा जन्म
१९६२ : अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक गौतम अदानी यांचा जन्म
१९३८ : अझरबैजान देशाचे २रे राष्ट्रपती अबुलफाज एलचिबे यांचा जन्म (मृत्यू : २२ ऑगस्ट २०००)
१९२७ : भारतीय लेखक, कवी आणि गीतकार कन्नादासन यांचा जन्म (मृत्यू : १७ ऑक्टोबर १९८१)
१८६९ : महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांचा जन्म (मृत्यू : १८ एप्रिल १८९८)
२४ जून मृत्यू
१९०८ : अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८३७)
१९१४ : वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती यांचा गरुडेश्वर, बडोदा, गुजरात येथे निधन. (तारखेप्रमाणे)
१९९७ : ओडिसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९४४)
२०१३ : इटलीचे ४०वे पंतप्रधान एमिलियो कोलंबो यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९२०)
२०२२ : भारतीय अभिनेते व्ही. पी. खालिद यांचे निधन
२०२२ : भारतीय अभिनेते रायमोहन परिदा यांचे निधन
१९८० : भारताचे ४थे राष्ट्रपती भारतरत्न व्ही. व्ही. गिरी यांचे निधन (जन्म: १० ऑगस्ट १८९४)
१५६४ : गोंड साम्राज्याची राणी राणी दुर्गावती यांचे निधन (जन्म: ५ ऑक्टोबर १५२४)
News - todayspecialdays




Petrol Price




