महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३६ अन्वये मनाई आदेश जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आगामी काळात गडचिरोली जिल्हयात १७ जून २०२६ ते २६ जून २०२६ या कालावधीत मोहरम उत्सव साजरी करण्यात येणार आहे. मोहरम उत्सव शांततेत पार पडावे याकरीता गडचिरोली जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे. 

त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली, एम रमेश यांना महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३६ प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना खालील नमुद केल्या प्रमाणे लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार पुढीलप्रमाणे प्रदान करीत आहे.

मोहरम उत्सवाच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणूकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, मोहरम उत्सव दरम्यान धार्मिक पुजा, स्थानाच्या जवळ लोकांचे वागणूकीबाबत निर्बंध घालण्याचे अधिकार, मोहरम उत्सवाच्या ठिकाणी बाधा होणार याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा, स्थानाचे जवळ लोकांचे वागणूकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, मोहरम उत्सव दरम्यान रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणे, ढोल ताशे वाजविणे इ. निर्बंध घालण्याचे अधिकार, मोहरम उत्सव दरम्यान सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, मोहरम उत्सव दरम्यान सार्वजनिक ठिकाणी / रस्त्यावर लाऊड स्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, कलम ३३,३५,३७ ते ४०, ४२,४३ व ४५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये काढण्यात आलेला आदेशाची अमंलबजावणी करण्याचे व सुचना देण्याचे अधिकार हा आदेश संपूर्ण गडचिरोली जिल्हा कार्यक्षेत्रात १७ जून २०२६ चे ००.०१ वा. पासून ते ०१ जुलै २०२६ चे २४.०० वा. पर्यंत लागू राहील.

या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १३४ प्रमाणे कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहील. सदरचा आदेश आज १५ जून २०२६ रोजी पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम रमेश यांच्या सही शिक्क्यानिशी जारी केलेला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos