महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई बनावट चलनी नोटा रॅकेटचा पर्दाफाश


- हायटेक पिं्रटर, बॉण्ड पेपर, व बनावट नोटा सह एकुण ३९ हजार ७०० किंमतीचा मुद्देमाल जप्त 

- बँकेत जमा झालेल्या बनावट चलनी नोटामुळे उघड झाले रॅकेट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात बनावट चलनी नोटांचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोस्टे गडचिरोली व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांचे संयुक्त कारवाईत बनावट चलनी नोटा, हायटेक कलर पिं्रटर, संगणकीय उपकरणे, बॉण्ड पेपर आणि नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कागद व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.  

सविस्तर वृत्त असे की, मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली १५ में २०२६ रोजी फिर्यादी नामेे प्रतिक बाबाराव अनासने, शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र गडचिरोली यांच्या फिर्यादीवरून पोस्टे गडचिरोली येथे अप क्र. ६०२२०२६ कलम १७९ भा. न्या. स.- २०२६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हाच्या तपास पोनि  विनोद चव्हाण यांनी हाती घेतला. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम डिपॉझीट मशीनचे सिसिटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता ११ में २०२६ रोजी रुपये १०० च्या २१ असे रुपये २१००/- बनावट चलनी नोटा आरोपी नामे प्रमोद टिकाराम कोवे, वय २३ वर्ष रा. हळदा ता. ब्राम्हपुरी जि. चंद्रपुर याने बनावट चलणी नोटा बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम डिपॉझीट मशीन येथे जमा केल्याचे निष्पण झाले. सदर आरोपी प्रमोद टिकाराम कोवे यास १५ में २०२६ रोजी रात्री अटक करण्यात आली. अटक आरोपीकडे सखोल चौकशी केले असता त्याने सदर बनावट नोटा या आदित्य जनार्धन रेचनकर, १९ वर्ष, रा. राम मंदिर आरमोरी रोड गडचिरोली जि. गडचिरोली याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. 

तसेच आदित्य रेचनकर हा नागपुर येथे वास्तव्यास असलेल्या चिटू नावाच्या व्यक्ती कडुन बनावट नोटा आणत असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे आरोपी नामे आदित्य रेचनकर व ईतर संशयीत आरोपींचा शोध घेण्यासाठी पोस्टे गडचिरोली तसेच स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांचे संयुक्त पथक १६ में २०२६ रोजी रात्री नागपुर येथे रवाना झाले. तांत्रिक विश्लेषन व आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे नागपूर शहरातील त्रिमुर्ती नगर परिसरातील एका अपार्टमेंट मधील फ्लॅटवर छापा टाकण्यात येवून झडती घेतली असता सदर फ्लॅटमध्ये बनावट चलनी नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पिं्रटर, बॉण्ड पेपर , कटर, अर्धवट छापलेल्या चलनी नोटा ईत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी आरोपी नामे १) मयुर लक्ष्मीकांत डोईजळ वय-३१ वर्ष रा. कॅम्प एरिया गडचिरोजी जि. गडचिरोली २) आदित्य लक्ष्मीकांत डोईजड वय-२६ वर्ष रा. कॅम्प एरिया, गडचिरोली जि. गडचिरोली 3) आदित्य जनार्धन रेचनकर वय-१९ वर्ष, रा. राम मंदिर आरमोरी रोड गडचिरोली जि. गडचिरोली यांना ताब्यात घेण्यात आले असून सदर आरोपींना १७ में २०२६ रोजी पोस्टे गडचिरोली येथे आणून अटक करण्यात आली.

यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे १५ में २०२६ रोजी अप. क्र. ६०२/२०२६, कलम १७९ भा. न्या. स. २०२३अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवून, मिळून आलेला मुद्देमाल, (१) १०० रुपयेच्या २१ नोटा असे एकुण रुपये २१०० बनावट नोटा, (२) एचपी कलर पिं्रटर मॉडल क्रमांक ४१९HP Ink Tank Wireless  १५ हजार - रुपये किंतमीचे, (३) jk Bond  चे पूर्ण रिम ५४० रपये किंतीचे कोरा रिम, (४) रुपये ५० चे पेपवर छापलेले ३१पाने (रुपये १५५०/- बनावट), (५) रुपये १०० चे पेपरवर छापलेले १८० पाने (रुपये १८ हजार  बनावट), (६) रुपये २००चे पेपवर छापलेले ४ पेजेस रुपये (८००- बनावट), (७) रुपये १०० चे १२ नोटा (रुपये १२००/- बनावट), (८) कट केलेले पेजेस नोटा बाजुला काढुन ठेवलेले ५५७ पाने रुपये ४६० किंमत, (९) एका बाजुला १०० व दुस­या बाजुला २०० असे छापलेले १ पान, (१०) एका बाजुला १०० व दुस­या बाजुला ५० असे छापलेले ०१ पान, (११) कोरे बॉन्ड पाने ४८, (१२) २ लहान प्लास्टीक स्केल रपये १०, (१३)२ कटर ४० रुपये किंमतीचे असा एकणु ३७ हजार ६०० रुपये किंमतीचे कलर पिं्रटर व पिं्रटींग केलेले रुपये ५०, रुपये १००, रुपये २०० बनावट नोटा व कागद असे साहित्य मिळुन आले व मुळ फिर्यादीने  २१,००/- रुपये बनावट नोटा असे एकुण ३९ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर चारही आरोपीस २२ में २०२६ पावेतो पोलीस कोठडी मिळालेली असून सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे गडचिरोली येथील पोनि  विनोद चव्हाण हे करीत आहेत.    

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक, गडचिरोली अनिकेत हिरडे यांचे मार्गदर्शनाखालीे  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण फेगडे, पोस्टे गडचिरोली चे प्रभारी अधिकारी पोनि विनोद चव्हाण यांचे नेतृत्वात सपोनि. भगतसिंग दुलत, पोउपनि शिवाजी देशमुख तसेच  अंमलदार यांनी पार पाडली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos