महत्वाच्या बातम्या

 पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान -२०२६ अंतर्गत भाजपा जिल्हा वर्ग उत्साहात संपन्न


- माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टी, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६ अंतर्गत दोन दिवसीय जिल्हा प्रशिक्षण वर्ग उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हा जिल्हा वर्ग गडचिरोली येथील आर. के. सेलिब्रेशन हॉल येथे २१ व २२ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण वर्गाला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध आघाड्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या जिल्हा वर्गामध्ये संघटनात्मक बळकटी, पक्ष विचारधारा, केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना, बूथ सक्षमीकरण, आगामी निवडणुकांची रणनीती तसेच कार्यकर्त्यांची भूमिका यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाच्या विचारसरणीला अधिक सक्षमपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशिक्षण वर्गात विविध विषयांवर मार्गदर्शक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षण वर्गाला विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर,माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार तथा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, नागपूर भाजपा कार्यालय प्रमुख संजयजी फांजे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, गडचिरोली नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोळकर, आरमोरी नगराध्यक्ष रुपेश पुणेकर, वडसा नगराध्यक्ष लता सुंदरकर, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, सदानंद कुथे, प्रकाश गेडाम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा योगिता पिपरे, प्रशिक्षण वर्ग प्रमुख अनिल पोहनकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनीही प्रशिक्षण वर्गाला उपस्थिती  दर्शविली व प्रशिक्षण वर्गात हजर राहत प्रशिक्षण वर्ग पुर्ण करत कार्यकर्त्यांनी संघटन बळकट करत जनतेशी सतत संपर्क ठेवण्याचे आवाहन करत या प्रशिक्षण वर्गाला शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केले.

दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण वर्गामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात भाजपा संघटन अधिक मजबूत करण्यासाठी हा वर्ग निश्चितच दिशादर्शक ठरणार असल्याची भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos