महत्वाच्या बातम्या

 एटापल्ली तालुक्यात नव्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आ. धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून स्वागत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील मेंढरी, गर्देवाडा व वांगेतुरी या ग्रामपंचायतींमध्ये नुकत्याच प्रथमच मतदानाची प्रक्रिया पार पडून सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीमुळे गावांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

युवा नेते तथा अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात मंगळवारी राजवाड्यात आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांची भेट घेण्यात आली. आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी निवडून आलेल्या नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घडी चिन्हाचे  दुपट्टा गळ्यात टाकून जंगी स्वागत केले. यावेळी त्यांनी सर्वांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांवर भर देत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडावी, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos