महत्वाच्या बातम्या

 चारचाकी वाहन उलटून चालक ठार : महामार्गावर हळहळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : डोंगरगाव ते खडकी-बाम्हणी महामार्ग क्रमांक ५३ वर रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून चारचाकी वाहन उलटून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी १ सायंकाळी सुमारे ४:४५ वाजता घडली. मृतकाचे नाव विलास साहेबराव घाईट (वय ४१, रा. आनंदविहार, नागपूर) असे आहे.

कामानिमित्त गोंदियाला आले होते -
माहितीनुसार, विलास घाईट आपल्या खासगी कामानिमित्त गोंदियाला आले होते. काम पूर्ण करून परत जात असताना डोंगरगाव ते खडकी-बाम्हणी महामार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून त्यांचे चारचाकी वाहन (नोंदणी क्रमांक: एमएच १२-एक्सएक्स ८६११) अचानक उलटले.

अपघातानंतर उपचार -
अपघातात विलास घाईट गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना प्रथमोपचारासाठी सडक-अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना येथील खासगी रुग्णालयात भरती केले.

उपचारादरम्यान मृत्यू -
जखमी अवस्थेच्या गंभीरतेमुळे शनिवारी २ सकाळी ७:२० वाजता विलास घाईट यांना नागपूर येथील किंग्स वे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचारादरम्यान ८:४५ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिस कारवाई -
देवरी पोलिस ठाण्यांतर्गत अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Gondia




Related Photos