आजचे दिनविशेष


२५ एप्रिल महत्वाच्या घटना
१८५९ : सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.
१९०१ : स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.
१९५३ : डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला.
१९६६ : एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.
१९८३ : पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.
१९८९ : श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.
२००० : वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.
२०१५ : ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात ९१०० जण मारले गेले.
२००८ : जागतिक मलेरिया दिन
२०२२ : ट्वीटर - मायक्रो ब्लॉगिंग सोशल मीडिया नेटवर्क ट्वीटरने, एलोन मस्क कडून ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सला खरेदी करण्याची ऑफर स्वीकारली.ट्वीटर - मायक्रो ब्लॉगिंग सोशल मीडिया नेटवर्क ट्वीटरने, एलोन मस्क कडून ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सला खरेदी करण्याची ऑफर स्वीकारली.
२५ एप्रिल जन्म
१२१४ : फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १२७०)
१८७४ : रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९३७)
१९१८ : हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९९३)
१९४० : हॉलिवूडमधील अभिनेता अल पचिनो यांचा जन्म.
१९६१ : अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक करण राझदान यांचा जन्म.
१९६१ : भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक दिनेश डिसोझा यांचा जन्म.
१९६४ : भारतीय राजकारणी आर. पी. एन. सिंग यांचा जन्म.
२००८ : जागतिक मलेरिया दिन
१९३६ : सुरिनाम प्रजासत्ताकचे पहिले पंतप्रधान हेन्क अर्रोन यांचा जन्म (मृत्यू : ४ डिसेंबर २०००)
१९२४ : भारतीय-अमेरिकन गणितज्ञ एन. यु. प्रभु यांचा जन्म (मृत्यू : १४ ऑक्टोबर २०२२)
२५ एप्रिल मृत्यू
१९९९ : साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचे निधन.
२००२ : लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचे निधन. (जन्म: १२ मे १८९९)
२००३ : ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १९१४)
२००५ : भारतीय साधू आणि शिक्षक स्वामी रंगनाथानंद यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १९०८)
News - todayspecialdays




Petrol Price




