महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिक मुख्यत : हॉटेल्स, रेस्टॉरंट फूड स्टॉल धारक किरकोळ विक्रेते यांना सूचना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / भंडारा : पनीर व चीज अनलॉग हे वेगवेगळे अन्न पदार्थ आहेत. परंतु आपल्याकडे उत्पादन, विक्री व प्रत्यक्ष अन्न आस्थापनांमध्ये याबाबतच्या स्वतंत्र वर्गवारी आढळत नाही. हॉटेल्स, रेस्टॉरंट मध्ये पनीर म्हणून चीज ऍनालॉग ची सर्रास विक्री करतात.

जसे पालक पनीर च्या भाजीमध्ये पनीर ऐवजी चीज ऍनालॉग वापरतात . पनीर महाग आहे त्यामानाणे चीज ऍनालॉग स्वस्त असतो. त्यामुळे ग्राहकाची फसवणूक होते.

कोणत्याही अन्न अस्थापना किंवा हॉटेलमध्ये पनीर व चीज ऍनालॉग हे मेनू कार्ड मध्ये स्वतंत्र उल्लेख केलेले दिसत नाही किंवा  उत्पादन ठिकाणी बिलाची तपासणी केली असता चीज अनलॉग हे पनीर म्हणूनच विकले जाते.

त्यामुळे यामध्ये १ मे २०२६ पूर्वी सर्व व्यावसायीकांनी आपल्या मेनू कार्ड मध्ये बदल करुन ते वापरत असलेले पनीर आहे की चीज ऍनालॉग आहे याबद्दल स्पष्ट माहिती मेनुकार्ड मध्ये तसेच आस्थापनाच्या दर्शनी भागात असावी.

भंडारा जिल्ह्यातील व तालुकास्तरावरील संघटना  (मावा/ खावा उत्पादक  संघटना , हॉटेल असोसिएशन, आहार संघटना, मिठाई व मिष्टांन्न संघटना,  पनीर व चीज अनलॉग उत्पादक संघटना इत्यादी सर्व संघटनांचे अध्यक्ष व सचिव)याना सुचना देण्यात येते की त्यानी १ मे २०२६ पूर्वी त्यांच्या उत्पादन, विक्री व हॉटेलमध्ये पनीर व चीज ऍनालॉग  हे अन्न पदार्थ स्वतंत्रपणे नोंदण्यात/नोंदी ठेवण्यात याव्या.तसेच संघटनेच्या सभासदाना माहिती द्यावी.

१ मे नंतर ज्या अन्न आस्थापनांच्या, पनीर व चीज ऍनालॉग हे अन्न पदार्थ  स्वतंत्रपणे नमूद केलेला नसल्यास त्यांच्येवर अन्न सुरक्षा व माणदे कायदा २००६ व त्या अंतर्गत नियमानुसार कायदेशीर कारवाई घेण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी अशा सुचना श्रीधर दुबे–पाटील अन्न सुरक्षा आयुक्त , महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या आहेत.

त्यामुळे व्यावासायीकानी कायदेशीर कारवाई होऊ नये यासाठी वरील प्रमाणे मेनू कार्ड मध्ये बदल करावे असे आवाहन यदुराज दहातोंडे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (म रा ) भंडारा यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos