महत्वाच्या बातम्या

 माजी आमदार तथा महाराष्ट्र भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) ४६ व्या स्थापना दिनानिमित्त दिल्ली येथील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला तसेच कार्यकर्त्यांना आगामी काळात अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी नवनियुक्त राज्यसभा खासदार मायाताई इवनाते, भाजपा आदिवासी मोर्चा नागपूरचे आकाश मडावी, तसेच नागपूर भाजपा महामंत्री महेंद्र उईके, विवेक नागभीरे, प्रशांत कुमरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात पक्षाच्या विचारधारेचा प्रचार-प्रसार आणि संघटन बळकटीसाठी विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.





  Print






News - Rajy




Related Photos