महत्वाच्या बातम्या

 नागपूर : मुलीशी बोलण्यावरून वाद, वडिलांची लोखंडी सळईने हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : मुलीशी भेटण्यास आणि बोलण्यास मनाई केल्यामुळे संतापलेल्या तरुणाने आपल्या आई-वडिलांसह पंकज ठाकूर यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केला, तर मदतीसाठी आलेल्या त्यांच्या मेहुण्याला गंभीर जखमी केले. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मातोश्रीनगर परिसरात गुरुवारी रात्री घडली.

पंकज ठाकूर (४५, रा. मातोश्रीनगर), राज्य राखीव पोलिस दलात चालक होते. त्यांच्या मेहुण्याचे नाव अर्पित (३०) असून, त्यावर उपचार सुरु आहेत. आरोपींमध्ये आकाश हरिदास मंडल (२३), हर्षित हरिदास मंडल (२६) आणि पुष्पा हरिदास मंडल (४७) यांचा समावेश आहे, ज्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाशचे पंकज ठाकूर यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. यामुळे मागील दोन वर्षांपासून पंकज ठाकूर यांच्यासोबत आकाशचा वाद सुरू होता. अनेक वेळा पंकज ठाकूर यांनी मुलीपासून आकाशला दूर राहण्याचे सांगितले, पण आकाश त्यांच्या मुलीशी संपर्कात राहिला.

गुरुवारी, परिसरातील मंदिरात हनुमान जयंती कार्यक्रम सुरू असताना आकाश मुलीशी बोलताना दिसला. यावरून पंकज ठाकूर आणि आकाश यांच्यात वाद झाला. मारहाणी झाल्याची माहिती आकाशने घरी आई-पित्याला सांगितली, ज्यामुळे पुष्पा आणि हर्षित संतप्त झाले.

आरोपी पुन्हा पंकज ठाकूर यांच्या घरी गेले आणि वाद चिघळला. यानंतर त्यांनी लोखंडी सळई आणि धारदार शस्त्राने पंकज ठाकूर यांच्यावर हल्ला केला. पंकज ठाकूर यांना लोखंडी सळई त्यांच्या छातीत घुसवून गंभीर जखमी केले. बचावासाठी आलेल्या मेहुण्याला धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले.

रुग्णालयात उपचारासाठी नेल्यावर डॉक्टरांनी पंकज ठाकूर यांना मृत घोषित केले. अर्पित यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले आणि पंचनामा करून आरोपींना अटक केली.





  Print






News - Nagpur




Related Photos