महत्वाच्या बातम्या

 नागपुरात गॅससाठी अर्धा किलोमीटर लांब रांगा : संतप्त नागरिकांनी रोखला रस्ता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्यात उन्हाचा पारा वाढत असतानाच आता सामान्य जनतेला गॅस सिलिंडरसाठीही पायपीट करावी लागत आहे. नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी परिसरात आज संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. नागपुरात गॅससाठी अर्धा किलोमीटर लांब रांगा संतप्त नागरिकांनी रोखला रस्ता राज्यात उन्हाचा पारा वाढत असतानाच आता सामान्य जनतेला गॅस सिलिंडरसाठीही पायपीट करावी लागत आहे.

नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी परिसरात आज संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. येथील एचपी (HP) गॅस एजन्सीसमोर पहाटेपासूनच नागरिकांनी सिलिंडरसाठी मोठी गर्दी केली होती. ही रांग तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत लांब गेल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, वानाडोंगरी येथील एचपी गॅस एजन्सीसमोर पहाटे ३-४ वाजेपासूनच नागरिक रिकामे सिलिंडर घेऊन उभे होते. मात्र, दुपारचे ऊन वाढूनही गॅसचा पुरवठा सुरळीत न झाल्याने ग्राहकांच्या संयमाचा बांध सुटला. संतप्त झालेल्या नागरिकांनी एजन्सीसमोरचा रस्ता रोखून धरला आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


गर्दीचे मुख्य कारण KYC?

सध्या गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांचे केवायसी पूर्ण झालेले नाही, त्यांना बुकिंग असूनही सिलिंडर मिळण्यास अडचणी येत आहेत. तांत्रिक प्रक्रियेतील विलंब आणि एजन्सीकडून होणारा अपुरा पुरवठा यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे बोलले जात आहे.

नागरिकांचे हाल दुपारच्या रणरणत्या उन्हात वृद्ध, महिला आणि कामगार वर्गाला तासनतास उभे राहावे लागत आहे. बुकिंग करूनही वेळेवर सिलिंडर मिळत नाही आणि केवायसीच्या नावाखाली आम्हाला चकरा मारायला लावल्या जात आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया एका ग्राहकाने दिली. 

या गोंधळामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे





  Print






News - Nagpur




Related Photos