मोहाडी तालुक्यात अवैध रेती उत्खननावर कारवाई : रेतीने भरलेला ट्रॅक्टर जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : मोहाडी तालुक्यातील रोहा गाय परिसरात प्रशासनाने अवैध रेती उत्खननावर मोठी कारवाई केली असून, रेतीने भरलेला एक ट्रॅक्टर जप्त केला आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी तुमसर आणि तहसीलदार मोहाडी यांच्या संयुक्त पथकाने १९ मार्च रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास केली.
प्राप्त माहितीनुसार, रोहा गावाजवळ वाहणाऱ्या वैणगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा असून त्याचा गैरफायदा घेऊन काही जण दीर्घकाळापासून अवैध उत्खनन करत होते. संधी मिळताच ट्रॅक्टर व ट्रकच्या माध्यमातून रेती काढून मोहाडी आणि आसपासच्या भागात विक्री केली जात होती.
कारवाईत जप्त झालेला ट्रॅक्टर (क. एमएच ३६ एजी ८७१३) तहसील कार्यालय मोहाडी येथे जमा करण्यात आला असून महसूल विभागाकडून पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या कारवाईत मंडल अधिकारी रामभाऊ सातवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी जे. डी. कुमरे, तलाठी विकास कदम, ए. ए. कोकुडे, पी. डी. कोहाडे आदी सहभागी होते.
प्रशासनाने ही कारवाई अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी आणि नदीपात्रातील नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी महत्वाची पाऊल मानली आहे.
News - Bhandara




Petrol Price




