बेपत्ता तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथील रहिवासी असलेल्या ३७ वर्षीय तरुणाचा मृतदेह साकोली पोलीस ठाणे हद्दीत झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना ८ मार्च रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हितेंद्र अशोक शिवणकर (वय ३७, रा. सौंदड, जि. गोंदिया) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हितेंद्र शिवणकर हे २७ डिसेंबर २०२५ रोजी घरातून कुणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता.
दरम्यान, ८ मार्च रोजी साकोली पोलीस ठाणे हद्दीत एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. तपासादरम्यान मृतदेहाची ओळख हितेंद्र अशोक शिवणकर अशी पटली.
या प्रकरणी मंगेश शिवणकर (रा. सौंदड) यांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
News - Bhandara




Petrol Price




