न्यू आझाद गोल्डन ग्रुपतर्फे आझाद गार्डनमध्ये संविधान सन्मान दिन साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : संविधान दिनानिमित्त न्यू आझाद गोल्डन ग्रुपतर्फे आझाद गार्डन, चंद्रपूर येथे संविधान सन्मान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर धनंजय साळवे यांनी उपस्थितांना भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानामुळे नागरिकांना मिळालेले विविध अधिकार व स्वातंत्र्य तसेच संविधानातील विविध कलमांची उपयुक्तता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन धनंजय तावाडे यांनी केले. त्यांनीच कार्यक्रमाचे संचालन केले. प्रकाश गुंटेवार यांनी आभार मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




Petrol Price




