महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


६ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१५२२ : फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.Government

१८८८ : चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.

१९३९ : दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१९५२ : कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.

१९६५ : पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.

१९६६ : दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.

१९६८ : स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.

१९९३ : ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.History

१९९७ : अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.

२०२२ : कोविड-१९ महामारी - भारताने कोविड-१९ अनुनासिक (Nasal Vaccine) लस मंजूर केली आणि चीननंतर असे करणारा दुसरा देश बनला.

२०२२ : लिझ ट्रस - युनायटेड किंगडमच्या पंतप्रधान बनल्या.

६ सप्टेंबर जन्म

१७६६ : इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १८४४)

१८८९ : स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी १९५०)

१८९२ : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड ऍपलटन यांचा जन्म.Time & Calendars

१९०१ : भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १९९७)

१९२१ : बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२)

१९२३ : युगोस्लाव्हियाचे राजा पीटर (दुसरा) यांचा जन्म.

१९२९ : हिंदी चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००४)

१९५७ : पोर्तुगालचे पंतप्रधान जोशे सॉक्रेटिस यांचा जन्म.

१९६८ : पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वर यांचा जन्म.

१९७१ : भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी यांचा जन्म.

१९१५ : बव्हेरियन लेफ्टनंट आणि राजकारणी, बव्हेरिया देशाचे मंत्री अध्यक्ष फ्रांझ जोसेफ स्ट्रॉस यांचा जन्म (मृत्यू : ३ ऑक्टोबर १९८८)

६ सप्टेंबर मृत्यू

१९३८ : नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक सली प्रुडहॉम यांचे निधन.

१९६३ : कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८८३)

१९७२ : जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खाँ यांचे निधन.

१९९० : इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचे निधन. (जन्म: २३ जून १९१६)

२००७ : इटालियन ऑपेरा गायक लुसियानो पाव्हारॉटी यांचे निधन.

२०२२ : भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार अरविंद गिरी यांचे निधन (जन्म: ३० जून १९५८)History

२०२२ : भारतीय राजकारणी, कर्नाटकचे आमदार उमेश कट्टी यांचे निधन (जन्म: १४ मार्च १९६१)

२०१९ : झिम्बाब्वे देशाचे २रे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांचे निधन (जन्म: २१ फेब्रुवारी १९२४)

१९७९ : ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष पी. के. मुकिया तेवर यांचे निधन (जन्म: ४ एप्रिल १९२३)

१९७८ : ऍडिडासचे संस्थापक अडॉल्फ डॅस्लर यांचे निधन (जन्म: ३ नोव्हेंबर १९००)





  Print






Related Photos