जिल्हास्तर मैदानी खेलो इंडिया सेंटर प्रशिक्षण : केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : खेलो इंडिया उपक्रम अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय मैदानी खेलो इंडिया अनिवासी प्रशिक्षण केंद्राकरिता ८ ऑगस्ट रोजी खेळाडू निवळ चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. यापुर्वी ही चाचणी ३० जुलै २०२६ रोजी ठेवण्यात आली होती. परंतु अतिवृष्टीमुळे सदर चाचणी रद्द करण्यात आली. ८ ऑगस्ट रोजी खेळाडूंची निवड चाचणी जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे.
१४ वर्षे आतील मुले /मुली यांनी ८ ऑगस्ट रोजी सकाळी९वाजता उपस्थित राहावे. खेळाडूचा जन्म ३० जुलै २०१३ ते ३० जुलै २०१५ या कालावधीत असावा. उंचीला प्राधान्य देण्यात येईल. सर्व खेळाडूंनी स्वतःच्या तयारीने यावे. प्रशिक्षण केंद्र हे अनिवासी आहे. आधारकार्ड व जन्म दाखला प्रत सोबत आणावे. खेळाडूंनी पासपोर्ट साईज २ फोटो सोबत आणावे.
उपरोक्त निवड चाचणी करिता चंद्रपूर जिल्ह्यातील व महानगरपालिका शाळेतील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत नोंदणी करून चाचणीच्या दिवशी उपस्थित रहावे. अधिक माहितीकरिता क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड (मो.न. ९४२३६७३२३२) व खेलो इंडिया मैदानी प्रशिक्षक रोशन भूजाडे (मो.न.७७९८१७४४३५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




