बल्लारपूरमध्ये गांजाचे सेवन करताना तीन तरुणांना अटक : कलम २७ एनडीपीएस अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील वस्ती विभागात गांजाचे सेवन करताना तीन तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीस ठाणे बल्लारपूर येथे एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार वस्ती विभागत कॉलरी परिसरात पेट्रोलिंगवर असताना तीन तरुण गांजाचे सेवन करताना आढळून आले.
पोलीसांनी आरोपी महेश पांडुरंग ढोले (३१) सुभाष वॉर्ड बल्लारपूर, सुजल मल्लेश अलवला (२१) सुभाष वॉर्ड बल्लारपूर, कुणाल शंकर डोंगरे (२१) झोकू नाला सुभाष वॉर्ड बल्लारपूर यांना तात्काळ ताब्यात घेतले.
आरोपींचा झडतीदरम्यान गांजा ओढण्यासाठी वापरण्यात येणारी चिलम, अर्धवट जळालेला गांजाची राख व अवशेष तसेच धूर ओढण्यासाठी वापरलेला मळकट कपडा मिळून आला. सदर साहित्य पंचासमक्ष घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
सर्व तिन्ही आरोपी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे झिंगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याची वैद्यकीय तपासणी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. तपासणीदरम्यान त्याचे रक्त व लघवीचे नमुने घेण्यात आले.
या प्रकरणी आरोपी महेश पांडुरंग ढोले, सुजल मल्लेश अलवला, कुणाल शंकर डोंगरे विरुद्ध पोलीस ठाणे बल्लारपूर येथे एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोहवा सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, लालू यादव, पोअं लखन चव्हाण, वैभव गाडगे, महेश कुकुडकर यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




