महत्वाच्या बातम्या

 पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे १५ एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

बुधवार १५ एप्रिल रोजी दुपारी १२.४५ वाजता सेलू तालुक्यातील केळझर येथे आगमन व पशुवैद्यकीय दवाखाना भूमिपूजन, आपले सरकार सेवा केंद्र आणि पशुवैद्यकीय चिकित्सालय सेलडोह इमारत लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी ४.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पशुपालक आणि शेतकऱ्यांच्या समस्याबाबत आयोजित बैठकीस उपस्थिती. सायंकाळी ६ वाजता सालोड हिरापूर येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन, महिला शेतकरी व पशुसखी सन्मान सोहळ्यास उपस्थित राहतील.





  Print






News - Wardha




Related Photos