इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार करीता इच्छुक असलेल्या व्यक्ती व त्या समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या संस्था, व व्यक्ती यांच्याकडून १० एप्रिल २०२ ६ पर्यत प्रस्ताव शासनास रितसर अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रस्ताव शासनास २०२५ - २६ साठी मागविणे सुरु झाले आहे.
नटराज पुरस्कार आणि पारंपारिक कारागिरांना विश्वकर्मा पुरस्कार दिला जातो.विमुक्त जाती व भटक्या जमातीकरीता सामाजिक, कलात्मक प्रबोधन इत्यादी क्षेत्रात काम करीत असलेल्या पारंपारिक लोककलाकार/लोककलावंत व पारंपारिक कारागिर यांना सदर योजना लागू आहे.
ब्रिटिशाविरोधात लढणारे क्रांतीवीर राजे उमान नाईक हे विमुक्त जाती व भटक्या जमातीपैकी एक असलेल्या म्हणजेच रामोशी समाजातील होते. यास्तव त्यांच नावाने राज्यातील भटके व विमुक्त समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कट समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाजसेवक अशा व्यक्तिंन यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार लागु असेल.
उपरोक्त प्रमाणे अधिक माहितीकरीता सहाय्यक संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. सचिन मडावी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण भंडारा यांनी केले आहे.
News - Bhandara




Petrol Price




