महत्वाच्या बातम्या

 भरधाव ट्रकची सायकलस्वाराला धडक : मजूराचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारपुर - चंद्रपूर बायपास मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलस्वार मजूराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी १४ मार्च रोजी सकाळी बाबूपेठ परिसरात घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मृतकाचे नाव तेजकुमार महादेव पाटील (वय ३४), रा. लालपेठ कॉलरी क्र.३, कामगार चौक, चंद्रपूर असे आहे. ते मजुरीचे काम करीत होते. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास ते सायकलने कामासाठी घरातून निघाले होते.

दरम्यान सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी आशा तेजकुमार पाटील यांना अज्ञात व्यक्तीकडून फोन करून बल्लारशा–चंद्रपूर बायपास रोडवरील जूनोना चौक ते आंबेडकर चौक दरम्यान, बाबूपेठ येथील यादव कॉम्प्लेक्ससमोर त्यांच्या पतीचा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या घटनास्थळी पोहोचल्या असता ट्रक क्रं. एमएच ४० सीएम ८५०४ रस्त्याच्या कडेला उभा असल्याचे दिसून आले. ट्रकच्या मागील भागात त्यांच्या पतीची सायकल अडकलेली असल्याचेही त्यांनी पाहिले.

जखमी अवस्थेत तेजकुमार पाटील यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर आशा पाटील यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाने वाहन वेगाने व निष्काळजीपणे चालवून अपघात घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. चंद्रपूर शहर पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक युवराज सहारे करीत आहेत.रीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos