भंडारा : मानसिक तणावातून तरुणीची घरात गळफास घेऊन आत्महत्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : आर्थिक अडचण आणि रोजगार न मिळाल्यामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या २० वर्षीय तरुणीने घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मृत व्यक्तीचे नाव तृणाली हरिहर मारबते, राहणी स. पागोरा (सावरगाव पुनर्वेसन) असे आहे.
ही घटना ८ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता घडली. घरातील परिस्थितीबद्दल चिंतित हरेश्वर मारबते यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तक्रारीवरून त्वरित मर्ग दाखल केला असून घटनास्थळी पंचनामा केला आहे.
सध्या पोलिस हे आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा सखोल तपास करत आहेत. प्राथमिक माहितीमध्ये घरातील आर्थिक अडचण, रोजगाराच्या अभावामुळे निर्माण झालेला मानसिक ताण या गोष्टी आत्महत्येची संभाव्य कारणे म्हणून समोर येत आहेत.
स्थानिक रहिवाशांमध्ये या घटनेने शोककळा पसरली आहे, आणि कुटुंबीय तसेच नातेवाईक गंभीर दु:खात आहेत
News - Bhandara




Petrol Price




