मणिपूर येथील आदिवासी महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरुद्ध निवेदनामार्फत निषेध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र ट्रायबल आघाडी आणि श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित फुले- आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली महिला कक्ष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मणिपूर येथील आदिवासी महिलांवर होणाऱ्या अत्याचारविरुद्ध निषेध करून २६ जुलै २०२३ ला जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
या निवेदनामार्फत राष्ट्रपती यांना कळविण्यात येते की, जर आपल्या देशात महिलावर अत्याचार होत राहिले तर, या देशातील महिला असुरक्षित असुन त्यांच्या मध्ये एक दहशतीचे वातावरण निर्माण होईल आणि प्रगती कधीही होणार नाही. त्यांनी या प्रकरणाकडे एक महिला म्हणून बघावे आणि एक आदिवासी समाजाची प्रतिनिधी म्हणून, आदिवासींच्या हक्कांची संरक्षक आणि भारतीय संविधानाच्या अंतर्गत सर्वोच्च पदाची धारक म्हणून त्यांनी या प्रकरणी गंभीर त्रासदायक परिस्थितित त्वरित हस्तक्षेप करावा आणि मणिपूरला भेट देऊन पीडित लोकांशी विशेषत: अत्याचार पीडित महिलांशी संवाद साधावा व गुन्हेगाराला कडक शिक्षा द्यावी.
मणिपूरच्या स्त्रियांना विशेषत: कुकी - झो आदिवासी समुदायातील महिलांना आधाराची गरज आहे. जी फक्त आपण देऊ शकता. हिंसाचाराच्या सर्व कृत्यांची सर्व समावेशक आणि कालबद्ध न्यायालयीन चौकशीची मागणी करावी. जेणेकरून एस.सी. आणि एस.टी. (पीओए) कायद्याअंतर्गत त्वरित खटला आणि गुन्हे कलेल्या सर्व आरोपींना अटक करावी.
अशाप्रकारे निवेदन देऊन सदर प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात आले आहे.
याप्रसंगी फुले- आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली च्या महाराष्ट्र ट्रायबल आघाडी जिल्हा अध्यक्षा, गडचिरोली प्रा. कविता उईके, महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे सदस्य प्रमोद सयाम, फुले- आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली च्या महिला कक्ष विभाग अध्यक्षा प्रा. प्रज्ञा वनमाली, कांदबरी केदार सदस्य (महिला कक्ष विभाग), सुरज भोयर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
News - Gadchiroli