महत्वाच्या बातम्या

 गांधी कुटुंबीय तुमच्या सोबत सोनिया गांधी, राहूल गांधीनी दिला धानोरकर कुटुंबियांना धीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मी अशा कठीण प्रसंगातून गेली आहे. राजीवचे निधन झाले तेव्हा राहूल तुमच्या मुलांपेक्षा राहूल छोटा होता. धीर सोडून नका. गांधी कुटुंबिय तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात आमदार प्रतिभा धानोरकर यांचे ज्येष्ठ काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधींनी सात्वंन केले. मायेने जवळ घेतले. त्यावेळी आमदार धानोरकर गहीवरल्या आणि सोनिया गांधीचेही डोळे पाणावले.  याप्रसंगी काँग्रेस नेते तथा माजी खासदार राहूल गांधी उपस्थित होते. 

राज्यातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले. ते रुग्णालयात असताना आणि त्यांच्या निधनानंतर राहूल गांधी धानोरकर कुटुंबीयांच्या संपर्कात होते. त्यांना आज शुक्रवारला भेटीसाठी दिल्ली येथे बोलाविले. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत आमदार प्रतिभा धानोरकर, त्यांचे दोन्ही मुल मानस आणि पार्थ, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर  प्रवीण काकडे उपस्थित होते. याप्रसंगी राहूल गांधी यांचीही उपस्थिती होती.

Facebook    Twitter      
  Print


News - Chandrapur | Posted : 2023-07-07
Related Photos