महत्वाच्या बातम्या

 लोकराज्यचा कृषी विशेषांक प्रकाशित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य मासिकाच्या एप्रिल-मे २०२३ च्या कृषी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

या विशेषांकामध्ये कृषी, फलोत्पादन, पशुसंर्वधन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय, सहकार व पणन, मृद व जलसंधारण आदी विभागाच्यावतीने राज्यात राबविण्यात येणाऱ्या  वैशिष्ट्यपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या यशकथांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. याच बरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे विशेष लेख तसेच महत्त्वाच्या घडामोडी, मंत्रिमंडळात ठरले या सदरांचाही समावेश या अंकात आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या  https://dgipr.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/  या पोर्टलवर हा अंक वाचकांसाठी उपलब्ध आहे.

  Print


News - Rajy
Related Photos