कापूस वेचण्यासाठी गेलेली महिला पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात ठार


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कसरगट्टा बिटातील कविटबोळी शेतशिवारात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना दिनांक २४ नोव्हेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
बेबीबाई हनुमान घोडरे (वय ५५) असे मृतक महिलेचे नाव असून ती कसरगट्टा येथील रहिवासी आहे. कसरगट्टा गावालगत असलेल्या कविटबोळी शेतशिवारात सर्वे क्र. ५५ मध्ये गंगाराम मोहन घोडरे यांच्या शेतात कापूस वेचण्याकरिता गेली असता जवळच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून महिलेला ठार केल्याची घटना घडली.
या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली असता वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृत महिलेला शवविच्छेदनाकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे पाठविण्यात आले.
या परिसरात वाघाच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्यामुळे वाघाचा बंदोबस्त तात्काळ करण्याची मागणी गावकरी जोमाने जोमाने करू लागले आहेत. 
 



  Print






News - Chandrapur | Posted : 2021-11-30




Related Photos