गडचिरोली जिल्हयात आज एक जण कोरोनामुक्त


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज गडचिरोली जिल्हयात 431 कोरोना तपासण्यांपैकी  नवीन कोरोनाबाधितांची संख्या निरंक तर 01 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30798 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30046 आहे. तसेच सद्या 5 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 747 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.56 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.02 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.
आज 1 कोरोनामुक्त झालेल्यामध्ये, मुलचेरा तालुक्यातील 01 जणांचा समावेश आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-10-17
Related Photos