जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांचा शाळेत घुसून शिक्षकांवर गोळीबार, महिला शिक्षकेसह मुख्याध्यापकाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / श्रीरीनगर :
मंगळवारी जम्मू -काश्मीरमध्ये दोन तासांच्या आत तीन दहशतवादी घटना घडल्या. या घटनांमध्ये तीन जणांवर गोळीबार करण्यात आला. दरम्यान आज पुन्हा एकदा जम्मू -काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील ईदगाह परिसरात दहशतवादी हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईदगाह परिसरातील एका शाळेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. जम्मू -काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.
श्रीनगरमधील सफा कदल भागात गुरुवारी अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका शाळेत घुसून मुख्याध्यापकाची आणि एका महिला शिक्षिकेची गोळ्या घालून हत्या केली.
समोर आलेल्या माहितीनुसार, दहशतवादी असल्याचा संशय असलेल्या बंदूकधाऱ्यांनी येथील अलोचीबाग येथील रहिवासी सतींदर कौर आणि दीपक कौर या दोघांवर सफा कडल येथे गोळीबार केला आणि ते गंभीर जखमी झाले.



  Print






News - World | Posted : 2021-10-07




Related Photos