महत्वाच्या बातम्या

 देशात मंकी पॉक्सचा रुग्ण आढळल्याने केंद्राच्या सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : एवढे दिवस आफ्रीकन देशातून उत्पत्ती झालेला मंकी पॉक्स अर्थात एमपॉक्स आजाराचा भारतात रुग्ण आढळला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मंकी पॉक्स आजाराचा संशयित रुग्ण चेन्नईत आढळला आहे. त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

हा आजार वेगाने प्रसारीत होत असल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना मार्गदर्शनपर सूचना जारी केल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने मंकी पॉक्स साथीला इमर्जन्सी म्हणून जाहीर केलेले आहे. त्यातच आता केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

सर्व राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना :

मंकी पॉक्सच्या संशयित रुग्णांचे विलगीकरण करावे, सर्व राज्य सरकारांनी नागरिकांमध्ये मंकी पॉक्सविषयी जागरूकता वाढवावी, मंकी पॉक्सविषयीची माहिती,संसर्गाची माध्यमे याविषयी लोकांना जागरूक करावे, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्य आणि जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणेची पाहणी करुन ती सुसज्ज करावी, रुग्णालयात मंकी पॉक्सचे रुग्ण तसेच संशयित यांच्या विलगीकरणाराच्या, त्याची ने-आण करण्याच्या सुविधा आहेत का?, याची खातरजमा करावी, संशयित रुग्णांचे नमुने विहित प्रयोगशाळांना पाठवण्यात यावेत तसेच पॉजिटीव्ह आढळणाऱ्या रुग्णांचे नमुने ICMR ला जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जावेत, सध्या देशभरात ३६ प्रयोगशाळा आणि तीन PCR किट्सना तपासणीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

हा आजार मंकी पॉक्स नावाच्या व्हायरसमुळे होतो. हा व्हायरस स्मॉल पॉक्स या आजाराला कारणीभूत असलेल्या (ज्याला आपण देवी म्हणतो ) व्हायरसच्या जात कुळीतलाच आहे. याच्या व्हायरसचा संसर्ग झाल्यावर शरीरावर चट्टे किंवा पुरळ येतात. एमपॉक्स हा चिकनपॉक्सशी संबंधित नाही. हा एमपॉक्स हा झुनॉटिक डिसीज आहे. हा प्राण्याशी मानवाचा संपर्क आल्याने पसरतो. मध्य आणि पश्चिम आफ्रीकी देशात याची अधूनमधून येत असते. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सची इमर्जन्सी घोषीत केल्यानंतर तीन आठवड्या्नंतर भारतात एमपॉक्स रुग्ण सापडला आहे. या आजारावर लस उपलब्ध नाही. तसेच हा आजार जरी प्राण्यापासून होत असला तरी नंतर तो माणसापासून माणसात पसरत असल्याने खळबळ उडाली आहे.





  Print






News - World




Related Photos