महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मध्ये ५६५ जागा रिक्त : १४ ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
रोजगार संदर्भ / गडचिरोली :
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५६५ जागा :
कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), प्रशासकीय अधिकारी ,सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, भूमापक आणि अनुरेखक पदाच्या जागा
- शैक्षणिक पात्रता :  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड पाहावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक  १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
  Print


News - Rojgar | Posted : 2021-09-17Related Photos